HW News Marathi
Covid-19

ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, त्यासंदर्भात स्थानिक प्रशासन घेणार निर्णय

नागपूर | मुंबई, पुणे आणि मालेगाव महानगरपालिका हद्द वगळता इतर सर्व रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर वस्तूंची एका लेनमधील पाच दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून त्या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानांचाही समावेश असल्याची माहिती आज (३ मे) राज्य शासनाच्या वतीने देण्यात आली. मात्र, एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील, अशी माहिती माहिती संचालक कार्यालय नागपूर यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून सांगतिले आहे.

नागपूर जिल्ह्याच्या ट्वीटमध्ये म्हणाले, “एकल दुकाने याचा अर्थ ज्या वस्तीत एका ठिकाणी लागून पाच पेक्षा जास्त दुकाने नाहीत, अशी दुकाने, असा असेल. कोणते दुकान एकल आहे की नाही याचा निर्णय स्थानिक प्रशासन करील. शॉपिंग कॉम्प्लेक्स, शॉपिंग मॉल येथील दुकाने बंदच राहतील.” त्यांनी महाराष्ट्र डीजीपीआर, सीएमओ महाराष्ट्र, इनफो नागपूर यांना हँशटँग केले आहे.

रेड झोनसंदर्भात सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

ऑरेंज व ग्रीन झोन व्यक्तिरिक्त कंटेन्टमेंट झोन वगळता इतर रेड झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांबरोबरच रस्त्याच्या एका बाजूकडील (एका लेनमधील) जीवनावश्यक वस्तू नसलेली स्वतंत्रपणे असलेली पाच दुकाने (स्टॅंड अलोन) सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या पाच दुकानांमध्ये मद्य विक्रीच्या दुकानाचा समावेश आहे. मात्र, एका लेनमध्ये पाचपेक्षा जास्त जीवनावश्यक नसलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत. ही दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे यासारखी इतर नियमांचे कडकपणे पालन करणे आवश्यक असणार आहे. तसेच शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, बाजार यामधील दुकाने ही बंदच राहतील, असेही धान सचिव भूषण गगराणी यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Unlock 2 : मुंबईकरांसाठी ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गदर्शक तत्वे जारी

News Desk

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन की कठोर निर्बंध? उद्धव ठाकरे जनतेला आज संबोधित करणार

News Desk

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊनचे संकेत

News Desk