HW News Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

राहुल गांधींच्या कारवाईवर ‘मविआ’च्या आमदारांचे तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session) आजचा शेवटचा दिवस आहे. या अधिवेशनात कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी शुक्रवारी रद्द करण्यात आली. मानहानी प्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी खासदारकी रद्द करण्याचा आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी आज (25 मार्च) तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले.

 

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली. तर त्या आमदार किंवा खासदारचे सदस्यत्व रद्द केले जाते. सूरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या विरोधात राहुल गांधींनी उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 30 दिवसांचा वेळी दिला. तरी ही राहुल गांधीला सुनावलेली शिक्षा स्थगिती झालेली नाही. परंतु,  मानहानी प्रकरणात राहुल गांधींना जामीन देखील मंजूर झाला. तरी सुद्धा राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली.  या पार्श्वभूमीवर विरोधकांनी विधानभनाच्या पायऱ्यांवर तोंडावर काळयापट्टया बांधून मूक आंदोलन केले.

 

Related posts

डॉ. पायल तडवी यांचे आई-वडील घेणार मुंबई उच्च न्यायालयात धाव

News Desk

कॅबिनेट बैठक, राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी आम्ही सर्व नियमांचे पालन केले आहे !

News Desk

काँग्रेस आमदार आसिफ शेख यांना हत्येची धमकी देणारे अजून मोकाट कसे?: विखे पाटील

swarit