HW News Marathi
महाराष्ट्र

गोव्यात काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेस देणार झटका!

गोवा।गेल्या अनेक दिवसांपासून काँगेसचे नाना पटोले हे पक्षात स्वबळाचा नारा देतांना आपण पाहिलं आहे. म्हणूनच आता महापालिका नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस आता स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: याबाबतची महत्वाची माहिती दिली आहे. त्यानंतर आता खुद्द शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील स्वबळाचा नारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता महाराष्ट्राबरोबरच गोव्यात देखील काँग्रेसला चितपट करण्याची तयारी आता सुरू केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करणाऱ्यांचे मत

पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाओ यांच्यासह गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी टीएमसीसोबत युतीसाठी चर्चेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शरद पवार भाजपविरोधी आणि बिगर काँग्रेस तिसरी आघाडी करण्याची शक्यता आहे. ज्यात TMC, AAP, NCP आणि इतरांचा समावेश असेल.राव यांनी नुकतंच सांगितलं होतं की, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) आणि महाराष्ट्र गोमंतक पार्टी (MGP) यांच्याशी युती करण्यासाठी चर्चा करेल. मात्र गोव्यातील अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते राष्ट्रवादी आणि GFP सोबत युती करण्याबाबत विभागले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस स्वबळावर चांगली कामगिरी करू शकते, असं राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या आघाडीला विरोध करणाऱ्यांचे मत आहे.

निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद

तर एनसीपीचे सरचिटणीस आणि गोवा प्रभारी प्रफुल्ल पटेल यांनी AICC प्रभारी दिनेश गुंडू राव, निवडणूक निरीक्षक पी चिदंबरम आणि GPCC नेत्यांना युतीच्या परिस्थितीबद्दल त्यांच्या पक्षाची नाराजी सांगितली आहे. काँग्रेसचा काळ संपत चालला आहे, असे पटेल यांनी म्हटलं आहे.राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलं, आम्ही ऐकले आहे की गोव्यातील काँग्रेस नेते त्यांच्या निवडणुकीच्या रणनीतीवरुन आपसात वाद घालत आहेत आणि AICC आतापर्यंत ते वाद सोडवण्यात असमर्थ राहिली आहे. राष्ट्रवादीने खूप वाट पाहिली आहे, पण आम्ही अंतहीन वाट पाहू शकत नाही.अस स्पष्ट केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाचा २७ फेब्रुवारीला मुंबईत मोर्चा धडकणार

News Desk

नितीन गडकरींनी ऐकवलं अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींचं वाक्य; म्हणाले…!

News Desk

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मालिकांच्या जावयाला NCB कडून अटक

News Desk