HW Marathi
महाराष्ट्र

अकरावी प्रवेशासाठी इन हाऊस कोटा आता १० टक्के

मुंबई | “पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्क्यांपर्यंत जाईल. तसेच अकरावीच्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना जागाच मिळणार नाही असा अनावश्यक समज निर्माण केला जात आहे. परंतु, ज्या शाळांमध्ये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आतापर्यंत २० टक्के इन हाऊस कोटा आहे तो इन हाऊस कोटा यंदापासून १० टक्के राखीव इतका करण्यात आला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी सर्व आरक्षणानंतरही ७ टक्के जागा या खुल्या गटासाठी शिल्लक राहतील”, असे शिक्षणमंत्री विनेाद तावडे यांनी आज (७ मार्च) स्पष्ट केले आहे.

“दहावीच्या परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचे टेन्शन घेऊ नये, पॅनिक होऊ नये. नीट अभ्यास करुन परिक्षा द्यावी, चांगले मार्क मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात नक्कीच प्रवेश मिळेल”, असा विश्वास देखील विनेाद तावडे यांनी यावेळी दिला आहे. “पुढील वर्षाच्या ११ वी प्रवेश प्रक्रियेमध्ये २० टक्के इन हाऊस प्रवेश कोटा १० टक्यांपर्यंत केला आहे. तसेच, के.सी. कॉलेज, मिठीबाई कॉलेज, एन.एम.कॉलेज, झेविअर्स कॉलेज इथे जो विद्यार्थ्यांचा ओढा असतो ती अल्पसंख्यांक असल्याने तिथे ५० टक्के आरक्षण व अल्पसंख्यांकांसोबत बाकी कुठलेच आरक्षण तिथे नाही आहे. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी आहे”, असेही तावडे यावेळी म्हणाले.

Related posts

फटाकेबंदीबाबत मी विचाराधीन आहे असं बोललोच नाही-रामदास कदम

News Desk

भीम आर्मीची उद्या अमरावतीमध्ये सभा

News Desk

अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणास अॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी दर्शविली सकारात्मक भुमिका 

News Desk