HW News Marathi
Covid-19

इंदापूरमध्ये सोलापूर वरून आलेला नागरिक कोरोना पॉझिटिव्ह….

इंदापूर | इंदापूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून ग्रीन झोन मध्ये असणारा इंदापूर तालुका पुन्हा एकदा रेड झोन मध्ये जातो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूरची मूळ रहिवासी असणारे व्यक्ती गेले दोन महिन्यांहून अधिक काळ सोलापूर येथे आपल्या लेकीकडे रहावयास होती. तिला शारीरिक इतर त्रास जाणवू लागल्याने दिनांक 31 मे रोजी सदरची व्यक्ती इंदापूर मधील मज्जित चौक या ठिकाणी असणाऱ्या आपल्या कुटुंबांमध्ये दाखल झाली .

दिनांक 1 जून रोजी या व्यक्तीच्या कुटुंबातील तीन व्यक्ती व रुग्णवाहिकेचा चालक आणि रुग्णाचा पुतण्या असे पाच लोक मिळून या व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुणे येथील रुबी हॉस्पिटल ला घेऊन गेले. सदर व्यक्ती चा चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याचे समजताच इंदापूर प्रशासनाकडून दर्गा मज्जीत चौक,नेहरू चौक, टेंभुर्णी नाका आधी भागातील परिसर सील करण्यात आला आहे.

शिवाय या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या घरातील 3 व्यक्ती, रुग्णवाहिका चालक व रुग्णाचा पुतण्या आणि या सर्वांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्ती आशा पंधराहून अधिक व्यक्तींना इंदापूर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोरंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वँब देखील घेण्यात येत आहेत.

इंदापूरात आतापर्यंत कोरोनाचे पाच रुग्ण होते.त्यापैकी भिगवण येथील महीलेचा मृत्यू झाला आहे. तर चार रुग्णांवर इंदापूरच्या आरोग्य विभागाच्या टीम ने यशस्वी उपचार करुन २९ मे व १ जून रोजी कोरोनामुक्त घोषीत करून घरी सोडले आहेत.

या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे नगराध्यक्ष अंकिता शहा,राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा गटनेते कैलास कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घाबरून जाऊ नका,कोरोना चा सामना करण्यासाठी इंदापूर प्रशासन सज्ज आहे असे मत व्यक्त केले. राजवर्धन पाटिल व नगराध्यक्ष अंकिता शहा यांनी घाबरून जाऊ नका परंतु काळजी घ्या, घरातून बाहेर पडू नका असे आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परळीत आढळलेल्या कोरोना बाधितांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग युद्धपातळीवर सुरू, नागरिकांनी सहकार्य करावे 

News Desk

हिंगोली जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६ वर

News Desk

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

News Desk