नवी दिल्ली | गेल्या २४ तासांत देशात तब्बल २,५५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२,५३३ इतका झाला आहे. यापैकी २९, ४५३ रुग्णांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर, आतापर्यंत एकूण ११, ७०६ जण कोरोनामुक्त होऊन आपापल्या घरी गेले आहेत. तर अत्यंत दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत १,०७४ जण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे. देशात पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाले आहेत. देशासाठी निश्चितच ही एक सकारात्मक बाब आहे. केंद्रीय गृहमंत्रालय आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज (४ मे) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे.
▶️42533 confirmed #COVID19 cases so far (2553 new cases reported since yesterday)
▶️29453 cases are under active medical supervision
▶️11706 people cured so far, in the last 24 hours, 1074 people cured (highest number cured till date): @MoHFW_INDIA pic.twitter.com/paylpDwyU0— PIB India (@PIB_India) May 4, 2020
“देशात आतापर्यंत ४२६ कोरोना तपासणी लॅब्स आहेत. आपण आवश्यकतेनुसार देशातील कोरोना तपासणी लॅब्सची संख्या वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. यापैकी शासकीय लॅब्सची संख्या ३१५ असून प्रायव्हेट लॅब्सची संख्या १११ इतकी आहे. कालच्या (३ मे) दिवसात देशात तब्बल ५७,४७४ कोरोना टेस्ट झाल्या आहेत. आवश्यकतेच्या तुलनेत देशात कोरोना टेस्टिंग कीट्सची संख्या देखील पुरेशी आहे. त्याचप्रमाणे, नमुन्याच्या निकषानुसार देशातील कोरोना टेस्ट्सची संख्या देखील वाढत आहेत”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.
As of now we have 426 #COVID19 testing labs in the Country. We are ensuring gradual increase in the number of labs as per need and there is no shortage of testing kits; As per sampling criteria the testing numbers are increasing: @MoHFW_INDIA Media Briefing on #COVID19 pic.twitter.com/JRqvBgc5ZF
— PIB India (@PIB_India) May 4, 2020
“देशातील कोरोनाचा डब्लिंग रेट म्हणजे कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा दर देखील वाढला आहे. देशातील कोरोनाचा डब्लिंग रेट हा आता १२ दिवस इतका झाला आहे. यापूर्वी देशातील कोरोनाचा डब्लिंग रेट ३.४ दिवस इतका होता. देशातील लॉकडाऊन आणि कन्टेन्टमेन्ट झोन्सच्या निर्मितीला चांगले यश येताना दिसत आहे. देशातील परिस्थिती आणखी सुधारण्याचे आव्हान आता आपल्यापुढे आहे. देशाती डब्लिंग रेट आणखी वाढवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत”, अशीही माहिती लव अग्रवाल यांनी यावेळी दिली.
Doubling time of #COVID19 cases has improved from 3.4 before lockdown to 12 days today, lockdown and containment efforts are yielding results, our challenge now is how to further improve these results, to further increase doubling time – JS, @MoHFW_INDIA #IndiaFightsCorona pic.twitter.com/PWft8Gf8Ju
— PIB India (@PIB_India) May 4, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.