HW News Marathi
महाराष्ट्र

कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंचे निर्देश

मुंबई |  राज्यात कंत्राटी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. अकोला येथील महामार्ग क्रमांक सहावर एका खासगी कंत्राटदाराकडून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू आहे. त्या डांबरीकरणाच्या प्लँटमध्ये 21 नोव्हेंबर रोजी स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी लक्षवेधी सूचना सदस्य विनायक मेटे यांनी मांडली. यावर सदस्य गोपीकिशन बाजोरिया, जयंत पाटील यांनीही संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

या मागणीची दखल घेवून कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित कंत्राटदारावर 8 दिवसांत गुन्हा दाखल करू. जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असे निर्देश  कडू यांनी दिले. राज्यातील कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करावे, असे निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जयंत पाटील भर पावसात भिजले आणि सातारच्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली…

News Desk

एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही ! उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

News Desk

अशोक चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींकडे पाठविला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

News Desk