HW News Marathi
महाराष्ट्र

पालघरमधील ११ हॉटेल्स होम कोरोंटाईन करणाऱ्यांसाठी राखीव

पालघर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानरपालिकेने ११ हॉटेल्स ताब्यता घेतले आहेत. त्या हॉटेल्समध्ये सेल्फ कोरोंटाईनमध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या सोयी-सुविधांची सोय करण्यात आली आहे. दरम्यान, हॉटेल्सच्या दरात कोणतेही बदल करण्यात आले नसून केवळ त्या व्यक्तींच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्याचे दंडाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी, रॉयल गार्डन, गॉल्डन कॅरट, सुवी पॅलेस, जी.एस मोटेल इन, शेल्टर, शेल्टर इंटरनॅशनल, साई रेसिडेन्सी, क्रिष्णा रिसॉर्ट, सनशाईन रेसिडेन्सी आणि ग्रॅन्ड रेसिडेन्सी या हॉटेल्समध्ये सेल्फ कोरोंटाईनच्या व्यक्तींची सोय करण्यात आली आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हॉटेल्सचा वापर फक्त सेल्फ कोरोंटाईन असलेल्या व्यक्तींसाठीच करण्यात येणार असून गरज लागल्यास अधिक सोयीदेखील उपलब्ध करणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

अद्याप पालघरमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला ७४ कोरोना पॉझिटिव्ह असून त्यातील २६ जण हे मुंबईचे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्यापासून (२२ मार्च) ३१ मार्चपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र बंदची ही मुदत गरज लागल्यास वाढवावी लागेल असेही यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सारथी जिवंत ठेवण्याबाबत महाविकास आघाडी व शरद पवारांची जबाबदारी – छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिपादन

News Desk

सोलापूर-गाणगापूर एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

Aprna

एकनाथ खडसेंनी मोदींविरोधातील रिट्विट केलेले ट्विट केले डिलिट

News Desk