HW News Marathi
Covid-19

पुण्यात ३ दिवस केवळ दुध आणि मेडिकल सेवाच सुरु राहणार

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा आता १ हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पुण्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकड्याला आळा घालण्यासाठी संपुर्ण पुण्यात कडक बंद ठेवण्यात आला आहे. उद्यापासून (१ मे) पुण्यात केवळ दुध आणि मेडिकल सेवाच सुरु असणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे त्या भागात उद्यापासून ३ दिवस किराणा, भाजीपाला, फळे, चिकन, मटण, अंडी या सगळ्याची विक्री करणारी दुकाने बंद राहणार आहेत. फक्त दुध विक्री सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. आणि घरोघरी दुध विक्की ही सकाळी ६ ते १० अशी ४ तासचं सुरु राहणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

तसेच, समर्थ, खडक आणि फरासखाना येथील पोलिस ठाणे पुर्णपणे बंद असणार आहेत. तर, स्वारगेट पोलीस ठाण्याच्या भागातील गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी इथेही बंद लागू होईल. तसेच, नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मशीद जवळचा परिसर, भीमपुरा लेन, बाबजान दर्गा/ क्वार्टर गेट, शिवाजी मार्केट/सरबतवाला रोड, शीतळादेवी मंदिर रोड या सर्व भागांमध्ये अतिरिक्त निर्बंध लागू होणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाविरोधात सर्जिकल स्ट्राइक करण्यात मोदी सरकार अपयशी, मुंबई हायकोर्टाने केंद्राला फटकारलं

News Desk

पुणे शहरात आज नवीन ३१८ रुग्णांची नोंद, एकूण संख्या ५ हजार ८५१ वर

News Desk

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयानं केंद्राला फटकारलं

News Desk