HW News Marathi
महाराष्ट्र

ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनात १८ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर

मुंबई | महाविकासआघाडी सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल (१५ मार्च) समारोप झाला. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २४ फेब्रुवारीपासून सुरू झाले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या प्रादुभार्वामुळे मुदतीपूर्वीच राज्य सरकारला हे अधिवेशन गुंडाळावे लागले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे पहिले अधिवेशन होते. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात १८ विधेयक मंजूर झाले आहे.

दरम्यान, राज्य सरकारच्या अर्थसल्पीय अधिवेशनात जनतेला काही मिळाले नसल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत केला आहे. “महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील जनतेच्या घोर निराशेने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आज सांगता झाली. राज्यातील अवाकाळीग्रस्त शेतकरी व सांगली, कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अधिवेशनातून काहीही मिळाले नाही,” असे ट्वीटमध्ये म्हणाले.

पाटील म्हणाले, आमची अपेक्षा आहे, पुढील अधिवेशनात तर ते संपूर्ण काळ सभागृहात उपस्थित राहून, आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देतील. या अधिवेशनात विधान परिषदेत २०१८ तारांकित प्रश्न आले होते. त्यातील ९०० प्रश्न स्वीकृत झाले तर अवघ्या ६३ प्रश्नांना मंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली.

अधिवेशनात मंजूर झालेले ‘हे’ १८ विधेयक

  • महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी भाषेचे सक्तीचे अध्यापन व अध्ययन विधेयक
  • महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र कृ वष उत्पन्न पणन (विकास व विवनयमन) (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र नगरपवरषदा, नगर पंचायती व औद्योवगक नगरी (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र नगरपवरषदा, नगर पंचायती व औद्योवगक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र कृ वष उत्पन्न पणन (विकास व विवनयमन) (दुसरी सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र (पुरिणी) विवनयोजन विधेयक
  • अन्न सुरक्षा व मानके (महाराष्ट्र सुधारणा) अवधवनयम
  • महाराष्ट्र विवनयोजन (अवधक खचथ) विधेयक
  • महाराष्ट्र विवनयोजन (व्व्दतीय अवधक खचथ) विधेयक
  • महाराष्ट्र विवनयोजन (तृतीय अवधक खचथ) विधेयक
  • महाराष्ट्र ग्रामपंचायत आवण महाराष्ट्र वजल्हा पवरषद व पंचायत सवमती (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदसयांचे वेतन व भत्ते (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र पवरचावरका (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र सहकारी संसथा (सुधारणा) विधेयक
  • महाराष्ट्र विवनयोजन विधेयक
  • वसम्बॉयवसस कौशल्य व मुक्त विद्यापीठ, पुणे (सुधारणा) विधेयक

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ जाहीर, उपमुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

Gauri Tilekar

लॉकडाऊन काळात अन्नधान्य वितरण करणाऱ्या व अन्नछत्र चालविणाऱ्यांना अल्पदरात अन्न धान्य

News Desk

‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेचा हात,’अतुल भातखळकरांचा घणाघात

News Desk