HW Marathi
महाराष्ट्र

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच मार्केटमध्ये हापूस दाखल

मुंबई । देवगडमधल्या हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ही पाठवली आहे. या पहिल्या हापूस पेटीला ७ हजार इतका दर मिळाला आहे.गेली दोन वर्षे प्रकाश शिरसेकर वाशी मार्केटला पेटी पाठवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातील हापूस मुंबईत दाखल झाला आहे.

दरवर्षीप्रमाणे देवगडला हा मान मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगड मधील संजय बाणे आणि प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतील आंबा मुंबईला रवाना झाला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याला जुलैमध्येच मोहर आला होता. या मोहराचे व्यवस्थित संगोपन केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार आंबा घेणे त्यांना शक्य झाले.

Related posts

फडणवीस सरकारची अंध व्यक्तींवर मुजोरी

News Desk

शहीद मेजर शशीधरन नायर यांच्‍या पार्थिवावर लष्‍करी इतमामात अंत्यसंस्कार

News Desk

नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा पूर

News Desk