HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा मनसेला धक्का; दोन माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती कल्याण-डोंबिवलीतील मनसेच्या २ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यांनी मनसेच्या नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. “केडीएमसीमध्ये पुजा पाटील आणि गजानन पाटील हे तालुका अध्यक्ष आणि कृषी बाजार समितीचे सदस्य आहेत. प्रकाश माने, विलास सचिव आणि संजीव तामाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. त्यांच्यासबोत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षी विकासाची जी काही कामे होत आहेत,” असे एकनाथ शिंदेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले आहे. 

एकनाथ शिंदे म्हणाले, “कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या अनेक वर्षी विकासाची जी काही कामे होत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अनेक लोकांनी विश्वास दाखविला आहे. आज देखील मनसेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. आणि त्या सर्वांचे स्वागत आहे. विकास एके विकास हेच आमचे आश्वासन आणि अजेंडा आहे. अनेक नगरसेवकांनी देखील त्यामुळे हे फोडा फोडीचे राजकारण नाही. आणि त्या भागातील विकास हा शिवसेना करू शकते, असे त्यांना वाटले असेल. आणि शिवसेनेच्या माध्यमातून लोकांना सोयीसुविधा देऊ शकतो, असे त्यांना वाटले असेल. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना आणि त्यांचे लोक प्रतिनिधी या भागात काम करत आहेत. शिवसेनेवर त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे.” 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील ११ हजार कैद्यांची पॅरोलवर सुटका होणार, गृहमंत्र्यांचा निर्णय

News Desk

आमचे सरकार स्थिर आहे, ज्यांना पाडून दाखवायचे आहे त्यांनी पाडून दाखवावे – नितीन राऊत

News Desk

समाजविघातक घटक सांगून परवानगी न घेता फोन टॅपिंग केल्याचा राऊतांचा आरोप

Aprna