HW News Marathi
महाराष्ट्र

विश्व हिंदू परिषदेच्या शोभा यात्रेत एअर रायफल, तलवारी, कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी | विश्व हिंदू परिषदेतील कार्यकर्त्यांनी एअर रायफल, तलवार विनापरवाना शोभा यात्रेत उपयोग केल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोभा यात्रेत सहभागी मुलींनी एअर रायफलचे ट्रिगर दाबत फायरिंग केल्याने मोठा आवाज झाला होता.

विश्व हिंदू परिषदेची ही शोभा यात्रा काल (२ जून) सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत होती. शोभा यात्रेदरम्यान २०० ते २५० कार्यकर्तेंनी यात सहभागी झाले होते. यमुनानगर येथील अंकुश चौक ते ठाकरे मैदान दरम्यान दुर्गा वाहिनीची शोभा यात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेत चार मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचे निदर्शनात आले. या वेळी एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाजही आला. त्याचबरोबर पाच मुली हातात तलवारी मिरवत असल्याचं ही दिसून आलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर

News Desk

शिक्षकांच्या बदल्या ‘ऑफ लाइन’ होणार?हा निर्णय भ्रष्टाचाराला वाव देणारा निर्णय असेल – पंकजा मुंडे

News Desk

बीडमध्ये महावीतरणाच्या विरोधात परळीत भाजप युवा मोर्चाचे अनोखे आंदोलन

Aprna