HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Winter Session 2021 : विरोधक महाविकासआघाडी सरकारला ‘या’ मुद्द्यांवर घेणार

मुंबई। राज्याचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरू होणार आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असून पुढील अधिवेशन नागपूरमध्ये करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे का(२१ डिसेंबर) पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून आयोजित केलेल्या चहापान्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. पंरतु, पटोलेंनी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर विधासभा अध्यक्ष पद रिक्त झाले. यानंतर गेल्या अधिवेशात कामकाज उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांन पाहिले होते. या यंदाच्या अधिवेशनात अध्यक्ष पदासाठी काँग्रेस आक्रमक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परंतु, अध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून कोणते उमेदवारचे नाव देण्यात येणार हे अद्याप कळाले नाही. 

भाजपच्या १२ निलंबित आमदाराचे निलंबन रद्द करा, विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी पद्धतीने व्हावी. ओबीसी राजकीय आरक्षण, सक्तीची वीज बिल वसुली, पेट्रोल डिझेल किंतमी जास्त, दारुवरील किंमती कमी, महिला सुरक्षा, कायदा सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न, कोरोना काळात झालेला भ्रष्टाचार या सर्व मुद्यांवर  यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

विरोधकांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी 

फडणवीसांच्या आरोपानंतर काल (२१ डिसेंबर) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत यांचे उत्तर देत म्हटले, “विधानसभा अध्यक्षांची निवडणुकीसाठी विरोधक असालयाला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले. नाही तर भाजपने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लढवावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याच बरोबर ओबीसी आरक्षण, कायदा सुव्यस्था, पेपर फुटी, वीज बिल आदी मुद्यांवर अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे पवारांनी सांगितले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत अजित पवारांची संरक्षणमंत्री राजनाथसिंहांशी चर्चा

News Desk

कसली आली कर्जमाफी, कुठलाच प्रस्ताव विचाराधीन नाही – सहकार विभाग

News Desk

भुजबळांचा तुरुंगवास हे एक राजकीय षडयंत्र

News Desk