HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र मुंबई

राज्यातील सिनेमागृह ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार

मुंबई | राज्यातील चित्रपटगृहं, नाट्यगृहं आणि मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेसह ५ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहेत. कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थिएटर्सना, नाट्यगृहांना आणि मल्टिप्लेक्सना ही संमती देण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. तसेच, योगा सेंटर सुरू करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रं अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थिएटर्स, नाट्यगृहं, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या या पुढच्या टप्प्यात एक एक करत हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

 

 

Related posts

आता महाशिवआघाडी नव्हे तर महाविकासआघाडी ?

News Desk

राज्यात वीज पडून नऊ जण ठार

News Desk

ठाण्यातील कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला बिबट्या

News Desk