HW News Marathi
Covid-19

बीकेसीत कोविड १९ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, १ हजार बेडची व्यवस्था

मुंबई | बीकेसीत कोविड १९ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (१८ मे) उद्घाटन करण्यात आले. बीकेसीमध्ये १ हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. राज्यात काल (१७ मे) एका दिवसात २ हजार ३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. राज्यातील दिवसेंदिवस वाढ्यात कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज ३१ मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. तर राज्यात काल ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लॉकडाऊन ४ संदर्भात आज काय बोलणार

राज्यात आजपासून ३१ मेपर्यंत चौथ्या लॉकडाऊन वाढवला आहे. यात सरकारने चौथ्या लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ३१ मे नंतर पुढील निर्णय सूचित करण्यात येईल, असे राज्य सरकारने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित करणार आहे. मुख्यमंत्री आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवला

राज्य सरकारने काल साथरोग कायदा १८९७ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत शासनास असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्याच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव अजोय मेहता यांनी हे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांची शासनाच्या सर्व विभागांनी या कालावधीत काटेकोर अंमलबजावणी करावी. तसेच यापूर्वी काढण्यात आलेले सर्व आदेश ३१ मे पर्यंत लागू राहतील, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले आहेत. विभागनिहाय सूट किंवा लॉकडाऊन उठविण्यासंदर्भात योग्य त्या सूचना वेळोवेळी दिल्या जातील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचे ४७ रूग्ण , मुंबई आणि उल्हासनरमध्ये महिलेला कोरोनाची लागण !

Arati More

नाशिकच्या दुर्घटनेला भाजप जबाबदार ! राजकारणाला सुरूवात

News Desk

लसीकरणाचा दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करा! – छगन भुजबळ

Aprna