HW News Marathi
महाराष्ट्र

गणपती विशेष गाड्यांची वेटिंग लिस्ट वाढता वाढता वाढे 

मुंबई | गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीपासून कोकणाकडे रवाना होणाऱ्या विशेष गाडयांचे आरक्षण फुल्ल झाले असून आता प्रवाशांची भिस्त विशेष अनारक्षित गाड्यांच्या घोषणेवर आहे. तसेच या गाडयांची प्रतीक्षा यादीही ४००च्या पुढे गेल्यामुळे अनेक प्रवाशांना जादा भाडे मोजून बसमार्गे गाव गाठावे लागणार आहे. तर दुसरीकडे रेल्वे, एसटी बसेस फुल्ल झाल्यामुळे लक्झरी बसेसचेही दर वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

यंदा गणरायाचे आगमन १३ सप्टेंबर रोजी होत असून रेल्वेच्या नियमाप्रमाणे चार महिने आधी आरक्षण करता येते. त्यानुसार गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून वेटिंग लिस्ट देखील वाढलेली आहे. याआधी जनशताब्दी एक्स्प्रेसचे वेंटिग लिस्टचे ११०० नंतर बंद करण्यात आली आहे. परिणामी कोकणातील चाकरमान्यांच्या मदतीला यंदा गणपती धावून आला असल्याचे दिसून येत आहे. रेल्वेचे तिकिट मिळाले नाही तर चाकरमानी खासगी ट्रव्हल्सने प्रवास करतात. परंतु यंदा रेल्वेच्या वेटिंग लिस्टचा आकडा वाढलेला दिसून येतो आहे. त्यामुळे गर्दीच्या काळात चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे.

गणशोत्सव काळातील गाडयांची वेटिंग लिस्ट

गाडी ८ ९ १० ११ सप्टेंबर

कोकणकन्या एक्सप्रेस ३९१ ४०१ ४०२ ५६६

मंगलोर एक्सप्रेस ९२ १२१ १८२ २७६

तुतारी एक्सप्रेस २३४ ३८४ ३९८ ६१४

जनशताब्दी एक्सप्रेस बंद ३९८ बंद बंद

मांडवी एक्सप्रेस १९७ बंद बंद २९५

तेजस एक्सप्रेस – – ११४ –

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिजित बिचूकलेंना पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत चक्क १०० च्या वर पडली मतं!

News Desk

बौद्धिक दिवाळखोरीचे महाराष्ट्रासमोर प्रदर्शन, तरुण भारतमधून राऊतांवर टीका

News Desk

#CoronaVirus : सीएए, एनआरसीविरोधातील ‘मुंबई बाग’ आंदोलन तूर्तास स्थगित

swarit