HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

देशात गेल्या २४ तासात ७५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढतच आहे. गेल्या २४ तासात देशात ७५,०८३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, १०५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील एकूण रुग्णांचा आकडा ५५,६२,६६४ इतका झाला आहे. देशात सद्यस्थितीला ९,७५,८६१ एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आत्तापर्यंत देशात ४४,९७,८६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

तसेच, आत्तापर्यंत देशात ६,५३,२५,७७९ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यापैकी ९,३३,१८५ चाचण्या या काल (२१ सप्टेंबर) करण्यात आल्या आहेत. देशात बाधितांचा आकडा वाढत असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याबळ वाढत आहे. राज्यात काल (२१ सप्टेंबर) ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Related posts

‘चांद्रयान – २’च्या यशस्वी मोहिमेनंतर काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न

News Desk

देशात कोरोना संख्या वाढतीच, २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

News Desk

विरोधी पक्षनेत्यांनी एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येईल | सामना

News Desk