HW News Marathi
Covid-19

देशात रूग्ण संख्येत घट मात्र मृत्यूचं प्रमाण वाढतं

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर रुग्णसंख्येचा विस्फोटच बघायला मिळाला. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून, गेल्या २४ तासांत ४,४५४ रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमावावे लागले आहेत.

देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आकडेवारी घसरत असल्याचं यातून दिसून येत असून, त्यात आणखी एक दिलासा म्हणजे याच कालावधी देशात तीन लाख २ हजार ५४४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची देशातील एकूण संख्या २७ लाख २० हजार ७१६ वर आली आहे. तर एकूण रुग्णसंख्या २,६७,५२,४४७ इतकी झाली आहे.

महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यात २६६७३ नव्या बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर नवीन २९,१७७ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५१,४०,२७२ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण ३,४८३९५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.१२% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिल्व्हर ओकवरील १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर सुप्रिया सुळेंच्या ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण

swarit

विद्यापीठ आणि महाविद्यालय ऑफलाईन सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव! – उदय सामंत

Aprna

चिंता वाढली ! राज्यात आज डेल्टा प्लस व्हेरियंटचा पहिला बळी, आरोग्यमंत्र्यांची माहिती

News Desk