HW News Marathi
Covid-19

देशात 38 हजार 792 नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासात 38 हजार 792 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 624 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 792 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 624 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 41 हजार जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात 7,603 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 15,277 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,27,756 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,08,343 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.15 % झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इंदापूरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी करूनच तालुक्यात घेण्यात यावे !

News Desk

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे | मुख्यमंत्री

News Desk

बीडमध्ये इंदुरीकर महाराजांच्या जाहीर किर्तनाला हजारोची गर्दी; कोरोना नियमांचे उल्लंघन

Aprna