HW News Marathi
Covid-19

देशात मृतांचा आकडा घटला, कोरोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!

नवी दिल्ली | देशातला कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत १,००,६३६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.तर २,४२७ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. देशात प्रथमच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन हजारांहून खाली आली आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आहे. १.७४,३३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आता करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ लाख एक हजार ६०९ वर पोहोचली असून करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या दोन कोटी ७१ लाख ५९ हजार १८० झाली आहे.

देशातली लसीकरण मोहीम सध्या जोमात सुरु असल्याचं दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १३ लाख ९० हजार ९१६ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. त्यापैकी १३ लाख ११ हजार १६१ नागरिकांनी पहिला तर ७९ हजार ७५५ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या २३ कोटी २७ लाख ८६ हजार ४८२ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्राची स्थिती काय?

राज्यात गेल्या २४ तासांत १२,५५७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन १४,४४३ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५५,४३,२६७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण १,८५,५२७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९५.५०% झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही, पण काही अत्यावश्यक सेवा सुरू करणार | मुख्यमंत्री

News Desk

पुण्यात १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू होणार! – अजित पवार

Aprna

राजकारणातील जुनी खाट ‘काँग्रेस’ महाराष्ट्राच्या राजकारणात का कुरकुरतेय ?

News Desk