HW News Marathi
देश / विदेश

रौप्यपदक मिळवणारे भारताचे पहिले IAS अधिकारी!

टोक्यो। टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. भारताने शनिवारी ‘पदकचौकार’ खेचल्यानंतर सुहास यशिराज यांनी समारोपाच्या दिवशी रौप्यपदक जिंकत पदकांमध्ये भर टाकली आहे. पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यशिराज यांनी अंतिम फेरी गाठली होती. सुहास यांनी सुवर्णपदक जिंकण्याची संधी होती. मात्र पराभव झाल्यामुळे रौप्यपदकावरच समाधान मानावं लागलं. यासोबत भारताच्या पदकसंख्येने १८ विक्रमी आकडा गाठला आहे.

सुहास यथिराज आयएएस अधिकारी असून टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे. सुहास यथिराज पदक जिंकणारे पहिले आयएएस अधिकारी ठरले आहेत. अंतिम सामन्यात सुहास यशिराज यांच्यासमोर फ्रान्सच्या अग्रमानांकित ल्युकास मझूरचं आव्हान होतं. याआधी सुहास यांनी उपांत्य फेरीत इंडोनेशियाच्या फ्रेडी सेटियावानवर २१-९, २१-१५ अशा ३१ मिनिटांमध्ये विजय मिळवला होता.

पंतप्रधानांकडून कौतुक

सुहास यथिराज यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. त्यांनी ट्विट करत सुहासला शुभेच्छा दिल्या आहेत. “सेवा आणि खेळांचा विलक्षण संगम! सुहास यथिराज यांनी आपल्या अपूर्व क्रीडा कामगिरीमुळे आपल्या संपूर्ण देशाची कल्पना पकडली आहे. बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याच्या भावी प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा”, असं ट्विट करत त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रमोद भगतला सुवर्ण

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. १९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने आज २१६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.

सुवर्ण दिवस…

भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस आहे. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे. पात्रता फेरीत, सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह, भारताच्या पदकांची संख्या १५ झाली आहे. ज्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षीय सिंहराजला दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झारखंडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

इंटरपोलचे प्रमुख मेंग हाँगवेई बेपत्ता

swarit

फेसबुक युजर्सचा डेटा पुन्हा एकदा लीक

News Desk