HW News Marathi
देश / विदेश

भारतावर पदकांचा वर्षाव ! पहिल्याच दिवशी ३ पदकं

टोक्यो। टोक्यो पॅरालीम्पिकमध्ये भारताला दुसरा पदक प्राप्त झालं आहे. सकाळच्या सुमारास टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल आहे. तर दिवसखेरीस उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं आहे. निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. यासोबतच त्याने आशिया खंडातील उंच उडी रेकॉर्डशी देखील बरोबरी केली आहे.

पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही निषादचं कौतुक केलं आहे. निशादने केलेल्या या अप्रतिम कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाद कुमारला ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिंल, “टोक्योमधून आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. निषादने पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत T47 प्रकारात रौप्य पदक मिळवलं आहे. तो एक प्रतिभावान खेळाडू आहे. त्याला शुभेच्छा.”

भारताला तिसरं पदक

भारतीय खेळाडूंवर आज टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये अगदी पदकांचा वर्षाव होत आहे. दिवसाच्या सुरुवातीला टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल. त्यानंतर काही वेळापूर्वीच उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं. निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत 2.06 मीटर उडी घेत पदक पटकावलं. तर आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले आहे.

41 वर्षीय विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताकडून 19.91 मीटर लांब थाळी फेकत हे यश मिळवलं आहे. विनोदच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे विनोदने देखील निशादप्रमाणे आशिया खंडातील एक नवं पॅरा एथलिट्सच रेकॉर्ड या थ्रोने प्रस्थापित केलं आहे. विनोद कुमारने सहा प्रयत्नांमध्ये हे यश मिळवलं. यातील पहिल्या प्रयत्नात त्याने 17.46 मीटर दूर थाळी फेकली. ज्यानंतर 18.32 मीटर, 17.80 मीटर, 19.20 मीटर, 19.91 मीटर, 19.81 मीटर असे थ्रो केले. यामध्ये पाचवा थ्रो हा त्याचा सर्वात लांब अर्थात 19.91 मीटरचा होता. ज्यासाठी त्याला कांस्य पदक देण्यात आलं.

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक!

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताला प्रथम यश मिळालं आहे. भारताच्या भाविनाबेन पटेलने टोक्यो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास ४ स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाबेनचा ३-० असा पराभव केला. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने मने जिंकली आहेत. भारताच्या भाविनाबेन पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मियाओ झांगचा ३-२ असा पराभव केला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली

News Desk

प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Manasi Devkar

केंद्राकडे ८० हजार कोटी आहेत का? असा प्रश्न विचारल्यानंतर पुनावाला यांनी केले मोदींचे कौतुक

News Desk