HW Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरात आज अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

मुंबई। मुंबईसह राज्यभरातील अनेक जिलह्यात आज अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आज (१९सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व आणि ईशान्य भागात दक्षिण गुजरात आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील सर्व शाळांना आणि कनिष्ठ महाविद्यालयांना शिक्षणमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. आपल्या परिसरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याच्या सूचनाही शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.

मुंबईत काल (१८ सप्टेंबर) रात्री पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली होती. जोरदार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले. काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई शहरात २० मिमी, पश्चिम उपनगरात ४० मिमी तर पूर्व उपनगरात ५१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई महापालिकाने ‘मुंबईकरांनो, समुद्रात जाणे टाळा, शिवाय पाणी भरलेल्या ठिकाणीही जाणे टाळा. आपली काळजी घ्या. मदत लागल्यास १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधा,’ असे पालिकेने आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून मुंबईकरांना आवाहन केले आहे.

Related posts

भिमाकोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेंना ताब्यात घ्या – आठवले

महाराष्ट्रात कोरोनाचा सातवा बळी,  कोरोनाग्रस्त ४० वर्षीय महिलेचा मुंबईत मृत्यू

rasika shinde

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उदय सामंत प्रयत्नशील

अपर्णा गोतपागर