नवी दिल्ली | भारताने चीनी वस्तूंवर आणि अॅपवर बंदी घातल्यानंतर आता चीनला आणखी एक धक्का दिला आहे. चीनी कंपन्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करुन घेतले जाणार नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली आहे.
नितीन गडकरी यांनी सांगितले की, जर चीनच्या कोणत्याही कंपनीने भागीदारी करत अन्य कोणत्याही कंपनीद्वारे हायवे प्रकल्प लाटायचा प्रयत्न केला तर त्यांना रोखले जाणार आहे. याशिवाय सरकारही MSME सेक्टरमध्ये चीनी कंपन्यांना सहभागी होऊ न देण्यासाठी पडताळणी करणार आहे.
केंद्र सरकार लवकरच चीन विरुद्ध पॉलिसी आणणार असून त्याद्वारे चीनी कंपन्यांचा भारतीय प्रकल्पांमध्ये समावेश बंद करण्यात येणार आहे. भारतीय कंपन्यांसाठी नियम सोपे केले जाणारा असून कोणत्याही प्रकल्पात भारतीय कंपन्यांना अधिकाधिक संधी कशी मिळेल याचाही या पॉलिसीमध्ये विचार केला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
India will not allow Chinese companies to participate in highway projects, including those through joint ventures: Union Minister Nitin Gadkari
— Press Trust of India (@PTI_News) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.