न्युयॉर्क | अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. मृतांचा आकडा अमेरीकेत १० हजाराच्या पुढे गेला आहे. तिथेच भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर ९ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र ६ एप्रिलला सकाळी रुग्णालयात त्यांच्या मृत्यू झाला. कांचीबोटला हे अमेरिकेत युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. ६६ वर्षीय ब्रह्म कांचीबोटला यांनी अमेरिकेत २६ वर्ष काम पत्रकारीकेत केले होते.
न्यूयॉर्कमध्ये असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ९ दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनासाठी उपचार घेत होते. परंतू, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कांचीबोटाला यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत त्यांना आदरांजली वाहीली आहे. पत्रकार ब्रह्म कांचीबोटला आपल्या चांगल्या कामासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्या पत्रकारितेला नेहमी स्मरणात ठेवले जाईल, अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
Deeply anguished by the passing away of Indian-American journalist Mr. Brahm Kanchibotla. He will be remembered for his fine work and efforts to bring India and USA closer. Condolences to his family and friends. Om Shanti. https://t.co/LXF8TOl4PZ
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
ब्रह्म कांचीबोटाला यांचे वय ६६ होते. युनायटेड न्यूज ऑफ इंडीयाचे ते प्रतिनिधी होते. त्यांनी २८ वर्ष पत्रकारीकेत काम केले तसेच ११ वर्ष त्यांनी फायनांन्शियल पब्लिकेशनमध्ये कंटेंट एडिटर म्हणून काम केले आहे. त्यानंतर न्यूज इंडिया टाइम्स वीकली मध्येही त्यांनी काम केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.