नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना आता की चिंताजनक आकडेवारी समोर येत आहेत. देशात शनिवारी (३ ऑक्टोबर) कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा १ लाखांच्या पार गेला आहे. देशात आतापर्यंत एकूण १ लाख ८४२ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशात आतापर्यंत नोंद झालेला कोरोनाबाधितांचा आकडा ६४ लाखांवर गेला आहे. त्यामुळे, निश्चितच देशासाठी ही एक चिंता वाढवणारी बातमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली आहे.
India's #COVID19 related deaths cross 1 lakh mark with 1,069 deaths reported in the last 24 hours.
With 79,476 new cases, the tally reaches 64,73,545 including 9,44,996 active cases, 54,27,707 cured/discharged/migrated cases & 1,00,842 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/7QvhmAG2RS
— ANI (@ANI) October 3, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत तब्बल ७९ हजार ४७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडा ६४ लाख ७३ हजार५४४वर पोहोचला आहे. तर याच एका दिवसात तब्बल १,०६९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाळींची संख्या आता १ लाख ८४२ वर पोहोचली आहे . दरम्यान, देशात १३ मार्च रोजी कोरोनामुळे एका ७६ वर्षीय व्यक्तीने आपला जीव गमावला होता. देशात कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू असल्याची नोंद आहे.
राज्यातील स्थिती
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात १५ हजार ५९१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर याच एका दिवसांत राज्यात १३ हजार २९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.राज्यासाठी एक अत्यंत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात तब्बल ११ लाख १७ हजार ७२० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात सद्यस्थितीत एकूण २ लाख ६० हजार ८६७ जण ऍक्टिव्ह रुग्ण असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.९१% झाले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.