HW News Marathi
देश / विदेश

साताऱ्याच्या प्रविण जाधवची टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कमाल!

टोक्यो | टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी करताना दिसत आहे. भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी ३२ जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्या अजून किमान दोन विजय आवश्यक आहेत.

मोदींनी मराठीतून साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलम्पिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधला. मराठमोळ्या प्रवीणशी व

त्याच्या मातापित्यांशी त्यांनी यावेळेसमराठीतून संवाद साधला मोदी यांनी प्रवीणशी संवादाची सुरुवातच मराठीतून केली ते म्हणाले, ”प्रवीणजी नमस्ते, काय कसं काय?”. त्यानंतर मोदीजींनी पहिलाच प्रश्न त्याला विचारला की, ”तू आधी अॅथलिटिक्स करत होतास मग आता अचानक तिरंदाजी स्पर्धेत ऑलम्पिकसाठी निवडला गेला आहेस. हा बदलाव कसा झाला?’ यावर खुलासा करताना प्रवीणने सांगितले. त्याचं सुरुवातीला राज्य पातळीवर ऐथ्लेटिक स्पर्धेसाठी सिलेक्शन झालं होतं. पण त्याची प्रकृती ऐथ्लेटिकसाठी योग्य नसल्याने त्याला त्याच्या प्रशिक्षकाने वेगळा कोणतातरी खेळ खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर प्रवीणने तिरंदाजीचा सराव सुरु केला आहे.

कोण आहे प्रवीण जाधव?

साताऱ्यातील प्रवीण जाधवने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव शिखरावर पोचवलं आहे. नेदरलँडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली होती. नॉर्वे, कॅनडा, चीन तैपेई, नेदरलँड यांसारख्या मातब्बर संघाला नमवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीच चीनसमोर त्यांना पराभव स्विकारावा लागलेला. या संघामध्ये तरुणदीप राय, अतानु दास या मातब्बर खेळाडूंसोबत महाराष्ट्राच्या प्रविण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजवला होता. सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावातून आलेल्या प्रविणचा प्रवास हा सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारचे अपयश लपवण्यासाठी सुशांतसिंह प्रकरणाचा वापर !

News Desk

सेल्फी घेणा-या युवकाला हत्तींनी चिरडले

News Desk

कोणीतरी काढा दिल्यानेच तुमचा आवाज विरोधात ! शिवसेनेची संभाजीराजेंवर टीका

News Desk