HW News Marathi
महाराष्ट्र

रॅली, मोर्चा, आंदोलन नको, इंदोरीकरांचे समर्थकांना आवाहन

शिर्डी | ‘स्त्री संग सम तिथीला झाला, तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते’ असे वादग्रस्त विधान प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केले होते. यानंतर इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. इंदोरीकरांनी पत्रत म्हटले की, “कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे करू नये,” असे आवाहन समर्थकांना केले आहे. इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अहमदनगरच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकरांना नोटीस पाठवली आहे. हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलाम २२ चे उल्लंघन असल्याचे समितीच्या सदस्याने म्हटले आहे.

 

इंदोरीकर महाराजांनी पत्रक प्रसिद्ध करुन, समर्थकांना आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. या पत्रकात इंदोरीकर महाराजा म्हणतात, “चलो नगर म्हणून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळे माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय हा शांतताप्रिय आहे. तरी आपणा नम्र विनंती करण्यात येत आहे की, आपण कोणीही, कुठेही, रॅली, मोर्चा, एकत्र जमने, आंदोलन करणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तरी आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी आपण सर्वांनी शांतता राखून सहकार्य करावे ही विनंती”

माझे सध्या वाईट दिवस, चांगले काम करताना त्रास होतो

“माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना त्रास होतोय,” वादग्रस्त वक्तव्यानंतर अशी प्रतिक्रिया इंदोरीकरांनी दिली आहे. बीड जिल्ह्यातील कड्याजवळच्या कुंभारवाडीत काल (१६ फेब्रुवारी) दुपारी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी “माझे सध्या वाईट दिवस आहेत. चांगले काम करताना एवढा त्रास होतो. या विषयावर आता मला काहीच बोलायचे नाही, असे मत इंदुरीकर महाराजांनी व्यक्त केले. या कीर्तनावेळी काही लोकांच्या हातात ‘आय सपोर्ट इंदुरीकर’, ‘महाराज आम्ही तुमच्यासोबत आहोत’ अशा आशयाचे फलक दिसून आले.

महाराज इंदुरीकर महाराज नेमके काय म्हणाले?

‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माल आला.’

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे होर्डिंग अपघात प्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक

Gauri Tilekar

आरपीआयला महाराष्ट्रात उमेदवार उभे करता येत नाही .. विलास गरुड 

News Desk

माजी राज्यमंत्री अशोक शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश!

News Desk