HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना काळात महाराष्ट्रात ६० कंपन्यांनी दीड लाख कोटींची गुंतवणूक केल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती!

मुंबई। कोरोनाच्या संकटानंतर महाराष्ट्रामध्ये ६० कंपन्यांनी गुंतवणूक केली असून एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या कालावधीमध्ये राज्यात झाली असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘इंडस्ट्रियल कॉन्क्लेव्ह २०२१’ मध्ये बोलताना दिली. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननंतर राज्य सरकारने कशाप्रकारे राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले याचा लेखाजोखा देसाई यांनी आपल्या भाषणामधून मांडला.

दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असून लॉकडाउननंतर राज्य सरकारने योग्य नियोजन करुन राज्याचं अर्थचक्र सुरु राहील यासंदर्भात काळजी घेतल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच राज्यामध्ये डेटा सेंटर्स, फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून झालेली रोजगार निर्मिती याबद्दलही देसाई यांनी माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये कोरोना कालावधीत ६० कंपन्यांनी एकूण दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचं देसाई यांनी सांगितलं. तसेच ही गुंतवणूक केवळ कागदोपत्री नसून प्रत्यक्षात कामालाही सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.७० टक्के उद्योगांना जमिनींचं वाटप करण्यात आलं असून यापैकी एकही करार बारगळणार नाही असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राला संभाळण्याचं काम सर्वांनी मिळून

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचंही भाषण झालं कोरोना काळामध्येही राज्याचं अर्थचक्र सुरु राहण्यासंदर्भात करण्यात आलेल्या आणि औद्योगिक क्षेत्रातील भविष्याच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्राला संभाळण्याचं काम सर्वांनी मिळून केल्याचं सांगत आभार मानले. सर्वांच्या सहकार्यानेच कठीण कालावधीमधून आपल्याला वाटचाल करणं शक्य झाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांआधी सुभाष देसाई आणि आदिती तटकरे यांची भाषणं झाली. या भाषणांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या कठीण कालावधीमध्ये राज्याला सक्षम आणि आर्थिक विकासाचा विचार करणारं नेतृत्व दिल्याबद्दल भाष्य केलं.

प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली

याचाच संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात, “माझं कौतुक होत आहे की या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये कसं नेतृत्व केलं; कसा महाराष्ट्र संभाळला. पण हे श्रेय आहे ते माझं एकट्याचं नाही. माझे मंत्रीमंडळातील सहकारी, प्रशासनातील सर्व अधिकारी, सारे कर्मचारी अगदी सफाई कर्माचारी सुद्धा आणि साहजीकपणे आपल्या राज्यातील नागरिक तसेच प्रसारमाध्यमांनी दिलेली साथसोबत महत्वाची ठरली. तुम्ही जी साथ देत आहात ती त्यावेळेला दिली नसती तर हे कठीण होतं,” असं म्हणत सर्वांचे आभार मानले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

OBC Reservation | राज्य सरकारच आता गोळा करणार इम्पिरिकल डाटा

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा!

News Desk

“गुडघे टेकणार नाही, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक”, ED च्या कारवाईनंतर राऊतांची प्रतिक्रिया

Aprna