HW News Marathi
महाराष्ट्र

महागाईचा भडका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 3 रुपये 50 पैशांची वाढ

मुंबई | देशात दिवसेंदिवस महागाई होत आहे. आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य पुन्हा एकदा खिशाला कात्री बसणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरमध्ये आजपासून (१९ मे)  ३ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये ८ रुपयांनी वाढला आहे. यामुळे आता घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १००० पार गेला असून व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ८ रुपयांनी महागला आहे. 

देशाची दिल्ली आणि मुंबईमध्ये १४.२ किलोंच्या घरगुतील एलपीजी गॅस सिलेंडर हा १००३ रुपयांना मिळणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत १०२९, चेन्नईत १०१८.५० रुपयांवर गेली आहे. गत वर्षी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती ८०९ रुपयांवरून आता त्यांची किंमत १००३ वर गेली आहे. देशात १२ दिवसांत एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. याच महिन्याच्या ७ मे रोजी घरगुतील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयाने वाढले होते. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ८ रुपयांनी वाढले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची जबाबदारी सरकार घेणार का? भाजपचा सवाल

News Desk

बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून स्वागत

News Desk

अर्थसंकल्पात पुण्याला गुणे आणि मुंबईला उणे, पानचट,पचपचीत आणि प्रतिगामी अर्थसंकल्प! – आशिष शेलार

Aprna