HW News Marathi
महाराष्ट्र

खून प्रकरणात विश्वास नांगरे पाटील यांचीही चौकशी

कोल्हापूर: सांगली जिल्ह्यातील अनिकेत कोथळे या तरुणाचा खून प्रकरणात पोलिस खात्याचा सहभाग स्पष्ट झाला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जण निलंबित झाले आहेत. आता सांगलीचे जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. केसरकर यांनी कोथळे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतरही माहिती दिली.

मृत्यू झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पोलिसांच्या तपासावर दबाव यायला नको, म्हणून आपण दोन दिवस उशीरा आल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच कोल्हापूर, सांगली, कराड या ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या थर्ड डिग्रीमुळे काही आरोपींचा मृत्यू झाला आहे. यासाठी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना ट्रिटमेंट कशी द्यायची, याबाबतची नियमावली आणि त्याचा साचेबद्ध आराखडा तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीज बचतीबाबत जागरूकता निर्माण करा! – उद्धव ठाकरे

Aprna

“आपला प्रवास खडतर, पण गरुड भरारी घेण्याची शक्ती तुमच्या सदिच्छांमुळे” – राज ठाकरे 

News Desk

हिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलारांचा सवाल

News Desk