HW News Marathi
Covid-19

४ वाजताच IRCTC वेबसाईट क्रॅश

नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांनंतर आता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून आता सर्वसामान्यांसाठी विशेष पॅसेंजर ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून म्हणजेच १२ मेपासून राजधानी दिल्लीतून देशभरातील एकूण १५ शहरांसाठी या विशेष पॅसेंजर ट्रेन्स धावणार आहेत. दरम्यान, या ट्रेन्ससाठीचे ऑनलाईन बुकिंग आज (११ मे) दुपारी ४ वाजता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर सुरु होणार होते. मात्र, देशभरातील अनेक इच्छुक प्रवाशांकडून एकाच वेळी तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न झाल्याने अवघ्या काहीच मिनिटांत IRCTCची वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “वेबसाईटवर ताण आल्याने थोड्याच वेळात विशेष पॅसेंजर ट्रेनचे तिकीट बुकिंग पुन्हा सुरु करण्यात येईल”, असे ट्विट करत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांचा गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर, संध्या. ६ वाजता विशेष नसाठीच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात होईल अशी माहिती IRCTC वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत होणार ऑक्सफर्ड लसीची मानवी चाचणी!

News Desk

महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आले मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधानांचा भेदभाव का? पंतप्रधानांच्या गुजरात दौऱ्यावर राष्ट्रवादी भडकली !

News Desk

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपयांचे वितरण सुरू

News Desk