HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

पुण्यात आयटी कंपन्या होणार सुरू

पुणे | पुणे शहरात आता लाॅकडाऊन ४ मध्ये प्रतिबंधित क्षेत्र वगळून IT Company करण्याची परवानगी उद्योग विभागाने दिलीआहे. यामध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत्या अटीवर आयटी कंपन्या सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. काही अटी आणि शर्तीनुसार कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

याआधी पुणे महापालिका हद्दीत केवळ अत्यावश्यक सेवा असलेल्या उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळून अन्य ठिकाणच्या आयटी कंपन्यांनाही परवानगी देण्यात आली.

पुणे शहरातील मगरपट्टा, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, कोथरूड, चांदणी चौक, नांदेड सिटी, रामवाडी परिसर, डेक्कन, नळस्टॉप, पाषाण, बाणेरसह इतर विविध ठिकाणी आयटी कंपन्या आहेत.

उद्योगक्षेत्राला चालना देण्यासाठी काही अटी आणि शर्तीनुसार सोशल डिस्टन्सचे पालन करत कंपन्या सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पुणे शहरात साडे चारशे मोठे आणि 1400 लहान आयटी उद्योग आहेत. तर 72 आयटी पार्क असून या कंपन्यांमध्ये साडेचार लाख कर्मचारी काम करतात.

Related posts

उल्हासनगरात मराठी नगरसेवकांचा वाढता टक्का

News Desk

बबनराव लोणीकरांना मानसिक उपचारांची गरज : खा.अशोक चव्हाण

News Desk

…तर मग तुम्ही हेडगेवार, गोळवलकर, नथुराम गोडसेच्या नावाने मतं मागून दाखवा !

News Desk