HW News Marathi
Covid-19

यंदा गणेशोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी नाही

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. राज्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमधील यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. गणेशोत्सवच्या काळात मंडळांनी बाप्पाची आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर उभा आहे. तर मूर्ती घडविणाऱ्या कारागिरांनी कोरोनापासून वाचण्यासाठी गाव गेल्यामुळे मूर्तीकारही प्रचंड विवंचनेत आहेत. त्याशिवाय गणेश मूर्तीची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पुरेशी शाडूची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, निरनिराळ्या आकाराचे रंगीबेरंगी खडे आदी साहित्य कसे मिळवायचे सर्वात मोठा प्रश्न सध्या मूर्तिकारांना भेडसावत आहे.

राज्यात येत्या २२ ऑगस्टला गणेशोत्सव सुरू होणार आहे. गणेश कार्यशाळांध्ये गणेशमूर्ती घडविण्याचे काम हे मे महिन्यापासूनच सुरू होते. मुंबईत आतापर्यंत तब्बल १२ हजार ५०० सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवापूर्वी एक महिना आधी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची लगबग सुरू होते. गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याची मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून आखणी सुरू होते. मात्र, यंदा गणेश कार्यशाळांंमध्ये फारशी लगबग दिसक नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांमध्ये ३ लाख १७ हजार ५३२2 कोरोना रुग्णांची नोंद

Aprna

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत जनजागृती करा, गाफिल राहू नका !

News Desk

कोरोना विरोधातल्या युद्धाला पुन्हा सुरुवात – मुख्यमंत्री

News Desk