HW News Marathi
महाराष्ट्र

रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, तुम्हाला याचे दुःख, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

मुंबई | “हिंदु, मस्लिम जातीय दंगली भडकवायच्या आहे की, रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, याचे दुःख आहे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मारला आहे. राज ठाकरेंनी आज (१७ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा ३ तारखेपर्यंत भोंग उतरवा नाही, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. यावर मिटकरींनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. 

राज ठाकरे म्हणाले, “हिंदु, मस्लिम जातीय दंगली भडकवायच्या आहे की, रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, याचे दुःख आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारीक परंपरा आहे. त्यामुळे येथे जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका, आणि ते होऊ शकत नाही. ३ तारखेनंतर हिंदुंनी तयार रहावे, म्हणजे कोणी तयार रहावे. म्हणजे दंगलीमध्ये तुमची मुले येणार आहे का?, याचा उत्तर तुम्ही पहिला द्या. तुम्ही हनुमान चालिसाचा विषय हा मुस्लिमाच्या विरोधात केला. काल महाराष्ट्रात काय अनेक मदरश्यातील मुस्लिम असतील अनेक इफ्तार पार्टी झाल्या.”  

मिटकरी नेमके काय म्हटले

हिंदु, मस्लिम जातीय दंगली भडकवायच्या आहे की, रामनवमी आणि हनुमान जयंती या दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, याचे दुःख आहे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारीक परंपरा आहे. त्यामुळे येथे जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका, आणि ते होऊ शकत नाही. ३ तारखेनंतर हिंदुंनी तयार रहावे, म्हणजे कोणी तयार रहावे. म्हणजे दंगलीमध्ये तुमची मुले येणार आहे का?, याचा उत्तर तुम्ही पहिला द्या. तुम्ही हनुमान चालिसाचा विषय हा मुस्लिमाच्या विरोधात केला. काल महाराष्ट्रात काय अनेक मदरश्यातील मुस्लिम असतील अनेक इफ्तार पार्टी झाल्या. तर त्या हनुमान चालिसाचे पठण झाले. माझ्या अकोल्या रामनवमीला राम फळ आणि हार विकणारे जास्ती जास्त मस्लिम आहेत. यानी कधी विरोध नाही केला. अनेक ठिकाणी हनुमान दिनाच्या दिवशी मुस्लिमांनी शरबत आणि पाणी वाटले. मराठा क्रांती मोर्चामध्ये पाणी आणि खजूर वाटले. इकते चांगले वातावरण महाराष्ट्रात असताना. आता ऐन वेळेवर तुम्ही ३ मेला भोंगे नाही काढले तर तुम्ही दगडे काढणार तर आम्ही पण दगडे काढू. कोण दगड काढणार आहे. कोणाला वेळ आहे तलवारी काढायला. हिंदु आणि मुस्लिमानचे प्रश्न हे इथले उदरनिर्वाहचे प्रश्न आहेत. मी जिथे राहतो तेथे मस्लिम समाजामध्ये भवानी मातेचे मंदिर आहे. त्यांना कधी त्याचा त्रास झाला नाही. आणि हिंदुच्या परिसरात मसजित असून त्या हिंदुना त्याचा कधी त्रास झाला नाही. भोंग्याचा त्रास कोणाला होतो. एका डेसिबलपर्यंत आवाज ठिक आहे. हे मौलवीपण तयार आहे. सर्वोच्च न्यायालयानुसार सायंकाळी दहा ते सकाळी ६ वाजेपर्यंत  कोणत्याही धार्मिक स्थळावर भोंगे नसावे. अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम चालतात त्यावर पण बोला. इथे समानता आहे. महाराष्ट्र दंगल नको आहे, भोंग वाटपाचा कार्यक्रम नको आहे. इथल्या मुलांना काही द्याचे असेल कर स्पर्धा परिक्षेची पुस्तक द्या. तुम्ही त्यांच्या हाती तलवारी जरी दिल्याना.तरी आम्ही त्यांच्या हाती पेन आणि पुस्तक देणार ही जी आमची फुले, शाहू, शिवाजी महाराज आणि आंबेडकरांची परंपरा आहे. हेच आम्ही शिकवू. तुम्ही थोपवण्याचा प्रयत्न करू नका. आणि हनुमान चालिसा, हनुमान चालिसा काय लावले. तुमच्या एकाही पदाधिकाऱ्याला हनुमान चालिसा पाठ नाही. शेवटी तुम्हालाच दोन ओळी म्हणता नाही आल्यात ना. हनुमान चालिसा आम्ही लहानपणापासून पाळण्यात शिकलेले हिंदू माणसे आहोत. इतके सुंदर हनुमान चालिसा तुलसीदासांनी लिहिली आहे. आणि तुलसीदासांनी हेही लिहिले की, रामचरितमानसवर उर्दु शब्दांचाही प्रभाव आहे. मुस्लिमांचा विरोध करू नका,  मुस्लिमांनी रामावर सर्वात सुंदर भजन म्हटले आहे. त्यांचे नाव आहे मोहम्मद रफी, चित्रपट गोपी, भजन आहे ‘सुख के सब साथी, दुःख में न कोई, मेरे राम, तेरो नाम एक साचा दुजा न होए’. दिलीप कुमार बाळासाहेब ठाकरे यांचे जीवश्य मित्र होते. ते जातीने मुस्लीम होते, त्यांनी गोपीची भूमिका केली. डॉ. जलील परकार हेही बाळासाहेबांचे निकटवर्तीय होते. तुम्ही महाराष्ट्रात किती मुस्लीम द्वेष पेरणार आहात. महाराष्ट्रात जातीय दंगे भडकणार नाहीत. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाचा दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही; संजय राऊतांची माहिती

News Desk

“महाराष्ट्रात लोकशाही नाही तर लॉकशाही”

News Desk

मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा म्हणजे ‘नो-कॉस्ट’ नव्हे, तर ‘नो-मेट्रो’  

News Desk