मुंबई । शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिवराज्याभिषेकाचा मुहूर्त साधत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज (६ जून) मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. कोल्हापूर येथून १६ जूनपासून या आंदोलनाला सुरुवात होईल असे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, उदयनराजेंनी देखील आता यावर आपले मत व्यक्त केले आहे.
“मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारने आता लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका जाहीर करावी”, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. मराठा समाज आपल्या लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे पुढेमागे उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. आता आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची गरजच आहे. आता ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे”, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.
तसेच, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.