HW News Marathi
महाराष्ट्र

राजकीय नेत्यांनी काय करायला पाहिजे, हे सांगणे लष्कराचे काम नाही !

मुंबई | तुम्ही लष्कराचे नेतृत्व करता, त्याच्याकडे लक्ष द्यावे. आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे, हे आम्ही सांगत नाही. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनी काय करायला पाहिजे हे आम्हाला सांगणे लष्कराचे काम नाही, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. यावर चिदंबरम यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदाविरोधात आज (२८ डिसेंबर) करेळमधील तिरुवनंतपुरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले.

चिदंबरम पुढे म्हणाले की, “बिपीन रावत सरकारची भाषा बोलत असून ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मी बिपीन रावत यांना विनंती करतो की, तुम्ही लष्करप्रमुख असून आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे हे सांगत नाही. तसेच राजकीय नेत्यांनी काय करायला हवे हे सांगण्याचे लष्कराचे काम नाही, ” असे पी. चिदंबरम यांनी रावल यांना सांगितले.

लोकांना चुकीच्या मार्गाला नेणे हे नेत्यांचे काम नाही. देशाच्या अनेक शहरांमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी हिंसाचार व जाळपोळ करणाऱ्या जमावांचे कसे नेतृत्व करीत होते हे आपण पाहिले. त्यामुळे अशाप्रकारच्या नेतृत्वाला चांगले नेतृत्व म्हणत नाही असे मत लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी व्यक्त केले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणे दिल्लीला रवाना! नेमकं काय कारण?

News Desk

भाजप सत्ता प्राप्त करण्यासाठी येनकेन मार्गाचा उपयोग करतेय – जयंत पाटील

News Desk

अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव ! सभागृहात प्रचंड गोंधळ…

News Desk