HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव महिला वसतीगृह प्रकरणानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांकडून महाराष्ट्रात ‘राष्ट्रपती राजवटी’ची मागणी

मुंबई | जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं.

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या आहेत.

राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही

यावर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले आहेत.

सुधीर मुनंगटीवारांची धमकीमुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालतं. धमक्या देणं योग्य नाही, असं सांगतानाच हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं आहे.

नवाब मलिक यांनी मुनगंटीवारांच्या वक्तव्याला हरकत घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचा बचाव केला. लोकशाहीत सरकार बरखास्त करू असं बोलण्याचा सदस्यांना अधिकार आहे. ही केवळ बातमी असती तर समजू शकलो असतो. पण या घटनेची व्हिडीओ क्लिप आहे. त्यामुळे तुम्ही संवेदनशीलतेने या घटनेवर कारवाई करावी यासाठी ही तळमळ आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘इन्फ्लुएंझा’ची लक्षणे दिसल्यास लगेचच उपचार करून घ्यावेत! – तानाजी सावंत

Aprna

“महाराष्ट्रमध्ये गुजरात-उत्तर प्रदेशसारखी कोरोना स्थिती नव्हती!” – नवाब मलिक

News Desk

मोदी आणि शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, राऊतांचा सवाल

News Desk