HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण ,खानदेशात कोरोनाचा शिरकाव !

जळगाव | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १८६ झाली आहे. पुण्यात ४ रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. तर दुसरीकडे जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळून आला आहे.खानदेशामध्येसुद्धा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे

मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्राच्या इतर भागांतही कोरोनाने शिरकाव केला आहे. जळगावमध्ये आता कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला असून त्यानंतर आता तो रूग्ण कोणाच्या संपर्कात आला आहे यासंबंधीची माहिती सध्या प्रशासन घेत आहे.

१४ एप्रिलपर्यंत देशात लाॅकडाऊन असून तोपर्यंत कोरोनारूग्णांची संख्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी एक कोरोना रूग्णालयसुद्धा उभा केले जाणार आहे .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने…!; शहांचे गंभीर आरोप

News Desk

सध्याच्या सरकारात मंत्री, खासदार आणि जनतेचेही कास्टिंग काऊच

News Desk

बचत गटांना संधी देण्यासाठी जिल्हा, तालुका स्तरावर विक्री मॉल उभारणार; सुनील केदार यांची घोषणा

News Desk