HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

मुंबई | भाजप नेते आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येते आहे.  शेलारांना यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ ही करण्यात येत आहे. या प्रकरणी शेलारांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे.

यापूर्वी एकदा सन २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापुर्वी अतिरेक्यांकडे शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपूरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार अँड आशिष शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याने ही बाब गंभीर आहे. याबाबत आज (८ जानेवारी) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आमदार आशिष शेलार यांना आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेची तिसरी यादी, बाळा नांदगावकर यांना उमेदवारीच नाही

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली

Aprna

सर्वोच्च न्यायालयाने OBC आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

Aprna