मुंबई | देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ आहेच. मात्र, देशात सगळ्यात जास्त कोरोना पॉझिटिव्ब रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मात्र, मुंबई महानगरपालिका ज्याप्रकारे काम करत आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक प्रसिद्ध कवि आणि लेखक जावेद अख्तर यांनीही केले आहे. भारतात सगळ्यात जास्त कोरोनाच्या टेस्ट या मुंबईत केल्या आहेत. त्यामूळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय. मात्र,, महापालिका उत्तम काम करत त्यांच्यावर उपचारही करत आहे. त्यामूळे त्यांचे विशेष कौतुकही जावेद अख्तर यांनी ट्विटरवरुन केले आहे.
Hats off to BMC 0f Mumbai . They have taken more tests than any other city or even any other state of India Highest number of test that is why highest number of positives who are immediately sent the treatment That is most effective of fighting and defeating corona. Thank you BMC
— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) April 16, 2020
मुंबईत सर्वाधिक चाचण्या केल्यामूळे बाधितांचा आकडाही जलद गतीने समोर येत आहे. तसेच, त्या सगळ्यांना त्वरित उपचारही मिळत आहे. त्यामुळे महानगरपालिका ज्या मार्गाने काम करत आहे तो मार्ग नक्कीच उपयुक्त आहे, असे मत व्यक्त करत मुंबई महानगरपालिकेला त्यांनी सलाम केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.