HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे शिक्षक मतदारसंघात अखेर काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

पुणे । राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. या निवडणुकीत महाविकासआघाडीला मिळालेले यश अत्यंत सूचक आणि महत्त्वाचे ठरते. तर बालेकिल्ल्यातच भाजपच्या पदरी पडलेली निराशा पक्षाला पक्षाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता पुणे शिक्षक मतदारसंघाचा निकाल लागला असून या मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर अखेर विजयी झाले आहेत. ३४ व्या बाद फेरीत जयंत आसगावकर विजयी झाल्याची माहिती समोर येते आहे.

आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे श्री. आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते. उमेदवारांची नावे व मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

News Desk

विद्यार्थिनीवर बलात्कार, हत्याप्रकरणी तिघांना फाशी

News Desk

सुशांतप्रकरणाचे निमित्त पुढे करून एका राजकीय पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी उचलली

News Desk