HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपने एकदा स्वतंत्र लढून बघावे, ६०-६५ जागेवर समाधान मानावे लागेल, जयंत पाटील

पंढरपूर | जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (पंढरपूर) दौरा केला. त्यांचा हा दौरा पक्षाच्या बैठकीसाठी होता. त्यावेळी ते हेलिकप्टरमधून पंढरपूरला पोहोचले. दरम्यान, याआधी अभिनेता अक्षय कुमार हेलिकप्टरने नाशिकला गेला होता त्यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी टीका केली होती. आज त्यांनीही हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्यानंतर त्यांना विचारले असता त्यांनी मला हेलिकॉप्टरची लिफ्ट मिळाली म्हणून आलो असे उत्तर दिले.

“भाजपने एकदा स्वतंत्र लढून बघावे, राज्यात त्यांना ६०-६५ जागेवरच समाधान मानावे लागेल”, असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. नुकतंच चंद्रकांत पाटील यांनी सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढून, आपली ताकद दाखवावी असे आव्हान केले होते. त्यांच्या या आवाहनाला जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. तर “भाजपनेही स्वतंत्र लढावे, त्यांना केवळ ६० ते ६५ जागाच मिळतील, त्यापेक्षा जास्त जागा ते जिंकू शकणार नाहीत”, असे जयंत पाटील म्हणाले.

तसेच, त्यांना यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेल्या वीज बिल वाढीविरोधातील आंदोलनाबाबत विचारण्यात आले, त्यावर जयंत पाटील म्हणाले, “सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. वीज बिलाचा हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल” असा विश्वास त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना भाजप निवडणुकीबाबत असे म्हटले होते. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस वेगळे लढले असते, तर राज्यात राष्ट्रवादीला २० आणि काँग्रेसला १० जागाच आल्या असत्या, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता. शरद पवारांच्या सामनातील मुलाखतीवरुन चंद्रकांत पाटील यांनी हे भाष्य केलं. यावेळी त्यांनी निवडणुका लागतील तेव्हा चारही पक्षांनी स्वतंत्र लढावे असे आवाहन केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जातोय, ईडीच्या कारवाईवरून सरनाईकांचं वक्तव्य!

News Desk

….म्हणून राज्यात कधीही भाजपची सत्ता येऊ शकते!

News Desk

तडीपार गुंडाचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

News Desk