नवी दिल्ली | जेईई मुख्य परीक्षेसाठी किमान ७५ टक्के गुणाच्या अटीतून विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. बारावी परीक्षेत कमीतकमी ७५ टक्के गुण घेण्याची अट या वर्षी लागू होणार नसल्याची माहिती केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. आयआयटी जेईईसाठी घेतलेला निर्णय आणि मागील शैक्षणिक वर्षासाठी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने, शिक्षण मंत्रालयाने पुढील शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा (मुख्य) साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळविण्याचे पात्रता निकष शिथिल केले आहेत. एनआयटी, आयआयआयटी, एसपीए आणि इतर सीएफटीआयशी संबंधित प्रवेश जेईई (मुख्य) वर आधारित आहेत.
राष्ट्रीय चाचणी संस्थे (एनटीए) द्वारे घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी), भारतीय अभियांत्रिकी विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (IIEST), शिबपूर (पश्चिम बंगाल) आणि इतर केंद्रीय अनुदानित तांत्रिक संस्था (सीएफटीआय – आयआयटी वगळता) मध्ये विविध यूजी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश दिला जातो.जेईई (ऍडव्हान्स) परीक्षेची तारीख जाहीर करताना, शिक्षणमंत्र्यांनी विद्यर्थ्यांच्या सुविधेसाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी इयत्ता बारावीमध्ये किमान ७५ टक्के गुण मिळवण्याची पात्रता निकष शिथिल केल्याचे जाहीर केले आहे.
Considering the decision taken for IIT JEE(Advanced) and in line with the decision taken for the last academic year, it has been decided to waive off the 75% marks (in class 12 exam) eligibility criteria under Joint Entrance Examination (Main) for the next academic year 2021-2022
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) January 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.