HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

“सत्तेत आल्यानंतर हिटलरने देखील मोठं स्टेडियम बांधून स्वतःचं नाव दिलं होतं” – जितेंद्र आव्हाड

मुंबई | जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारलं आहे. सध्या या स्टेडियमवर भारत वि. इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. जगातील सर्वात जास्त प्रेक्षक संख्या असलेलं स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ या नावाने ओळखलं जाणार आहे. भारतरत्न सरदार वल्लभ पटेल यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आलं होतं. मात्र आता ते नाव बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव या स्टेडियमला दिल्यामुळे मोदी सरकारवर टीका केली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची देखील ट्विट करत नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त केला आहे. आव्हाडांनी मोदींच्या या कृत्याची थेट तुलना हिटलरशी केली आहे.“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केली आहे.

दरम्यान, या स्टे़डियमला नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव देण्यात आल्यानं अनेकांनी टीकेची झोत उठवली होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीदेखील यावरून जोरदार टीका केली आहे.”काय नेता मिळाला आहे या देशाला. लोकं यांना विसरून जातील याची यांना चिंता आहे. यांना लोकांवर भरवसा नाही की मृत्यूनंतर यांची आठवण कोणी ठेवेल की नाही. यासाठीच मृत्यूपूर्वी स्टेडियम आपल्या नावे करून घेतलं,” असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली आहे.

 

Related posts

#LokSabhaElections2019 : अयोध्येतून होणार प्रियांका गांधींच्या रथयात्रेला सुरुवात

News Desk

गायीच्या दुधात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ

News Desk

सीरमला लागलेल्या आगीवरुन राजकीय वर्तृळात वेगळीच चर्चा रंगली!

News Desk