HW News Marathi
महाराष्ट्र

‘हा’मुख्यमंत्री वाईट आहे ,आव्हाडं अस का म्हणाले ?

मुंबई | सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे.याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कसे अपयशी ठरत आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न भाजपकडुन होतो आहे. मात्र मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेला एका कवितेची सध्या खुर चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एक कविता केली आहे. या कवितेत जितेंद्र आव्हाड यांनी ‘खरंच, हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’ असं शिर्षक दिले आहे.

आव्हाडांनी ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे,’ अशी कविता सोशल मीडियावर टाकली.त्यानतंर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी त्या कवितेवर कौतुकाचा वर्षावही केला आहे. या कवितेच्या माध्यमातून आव्हाडांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरून कौतुक केलयं आणि त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

आव्हाडांची कविता

खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे..!!

कधी थाळ्या वाजवायला

लावल्या नाही…

ना कधी मेणबत्या आणि दिवे

लावायला लावले …..

निर्णय घेताना घेतले

विश्वासात…..

विरोधकांचे त्यामुळेच

फावले…….

शांत राहून तो लढत आहे

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

मंदिर उघडा, बाजार उघडा

शाळा उघडा ते म्हणाले…..

परीक्षा पुढे ढकलल्या तर

ते रस्त्यावर पुन्हा पुन्हा आले….

कोरोना वाढला तर ते आता

फक्त सरकारला दोषी ठरवत आहे…

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

इमान तर विकले नाहीच

ना कोणत्या सरकारी कंपन्या विकल्या…..

कोरोनाचे आकडे लपवले नाहीच

खोट्याने न कधी माना झुकल्या….

घरी पत्नी आणि मुलगा

आजारी असतांना तो मात्र लढत आहे….

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

ना कुठे बडबोले पणा

ना कशाचा बडेजाव..

आठ हजार कोटीचे

विमान नको….

ना कोणत्या प्रकरणात

घुमजाव……

जे करतोय ते प्रामाणिक पणे

तो करतो आहे…..

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे….!!

व्यापाऱ्यांचे ऐकून घेतोय…

विद्यार्थ्यांचे ऐकून घेतोय….

गोर गरीब जनतेला

एकवेळ शिवभोजन मोफत देतोय….

निसर्ग चक्रीवादळ,कोरोना संकट

शेतकऱ्यांच्या अडचणी

साठी तो शांततेत लढतो आहे ……

विरोधकांचे खरंच राईट आहे….

खरंच…हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे…..!!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाची जोखीम कमी करण्यासाठी लसीकरण अत्यावश्यक! – छगन भुजबळ

Aprna

कोकणातील पूरस्थिती आटोक्यात, कोयनेत पाण्याची विक्रमी आवक जयंत पाटलांची माहिती…

News Desk

आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ घेतली जाईल, फडणवीसांचे सुचक वक्तव्य

News Desk