HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

ट्विटरच्या माध्यमातून आव्हाडांनी पुन्हा एकदा डागली मोदी सरकारवर तोफ

मुंबई | भारतात आणि भारताच्या इतिहासाता पहिल्यांदाच कोरोनामुळे  दलॉकडाउन लागू झाला आहे. दरम्यान, परदेशातून आलेल्या कोरोनाने एक-एक स्टेज पुढे जाण्यास सुरुवात केली आहे. लोकांच्या संपर्कात येऊन याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाने देशात शिरकाव करताच सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे होते, अशी टीका अनेक राजकीय नेत्यांकडून करण्यात आली होती. मात्र, ही वेळ टीका करण्याची नाही, असे सरकार आणि भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आले. याच मुद्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे. दरम्यान, या ट्विटमध्ये मोदी सरकारने टीका करण्यासाठी वेळ ठरवून द्यावी असा खोचक टोला या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी विरोधी पक्षाला आणि मोदी सरकारला लगावला आहे.

चीननंतर देशातील अनेक राष्ट्रांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारतात केंद्र सरकारने तातडीने पावले उचलायला हवी अशी मागणी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी केली होती. त्याचबरोबर लॉकडाउनचा निर्णय घ्यायला केंद्राने उशीर केला, अशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. त्यावर ही वेळ टीका करण्याची नसल्याचे भाजपाच्या आणि केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर ब्रिजेश कलाप्पा या व्यक्तीची पोस्ट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे.

Related posts

शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, पुढे कसे जाणार ?

News Desk

शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

News Desk

विरोधकांना संपविण्यासाठीचे षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही !

News Desk