HW News Marathi
Covid-19

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे पुण्यात कोरोनाने निधन

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीतही पत्रकार जनसामन्यांपर्यंत महत्त्वाच्या सर्व बातम्या वेळेत पोहोचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून सर्वच पत्रकार रात्रंदिवस काम करत आहेत. याच कोरोनाकाळात संयतपणे वार्तांकन करणारे ‘टीव्ही 9 मराठी’ या वृत्तवाहिनीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे आज (२ सप्टेंबर) पहाटे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ४२ वर्षांचे होते. पांडुरंग रायकर हे मूळचे नगर जिल्ह्यातील होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे कुटुंब आहे. पत्रकारितेतील १५ वर्षांचा अनुभव असलेल्या पांडुरंग यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातूनच नव्हे तर राजकीय वर्तुळातूनही मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले ?

पत्रकार पांडुरंग रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी केली जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला पांडुरंग रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या गावी गेले. मात्र, तिथेही त्रास सुरू होता त्यामुळं त्यांची कोपरगावमधे एंटीजेन टेस्ट करण्यात आली जी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर रविवारी 30 जुलैला रात्री त्यांना एम्ब्युलन्समधुन उपचारांसाठी पुण्यात आनण्यात आलं आणि पुण्यातील पत्रकारांनी त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने रायकर यांना जंबो हॉस्पिटलमधे भरती केलं . जंबो हॉस्पिटलमधे त्यांच्यावर ICU मधे उपचार सुरू होते. मात्र त्यांची परिस्थिती खालावत होती. त्यामुळं त्यांना दुसऱ्या खाजगी हॉस्पिटलमधे भरती करण्याचे प्रयत्न पुण्यातील पत्रकारांनी सुरू केले. मंगळवारी (१ सप्टेंबर) त्यांची ऑक्सीजन लेव्हल 78 पर्यंत खाली गेली. त्यांना जंबो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक एम्ब्युलन्सची गरज होती. अशी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

मंगळवारी रात्री एक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटीलेटर खराब झाला असल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर दुसरी एम्ब्युलन्स मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते पण त्या एम्ब्युलन्समधे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तोपर्यंत १२, १२.१५ वाजले होते. पहाटे ४ वाजता एम्ब्युलन्सम मिळवण्याचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे ५ वाजता एम्ब्युलन्स उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आणि आय सी यु मधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पांडुरंगचे मित्र असलेले पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात कार्डिॲक एम्ब्युलन्स जंबो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात गेल्या २४ तासांत ६६ हजारांच्या पुढे नवे रुग्ण आढळले

News Desk

महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत वाढवला लॉकडाऊन, सरकारकडून नवे नियम जारी

News Desk

मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, अमेय खोपकरांनी अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

News Desk