HW News Marathi
महाराष्ट्र

वानखेडेंसह नवाब मलिकांचीही न्यायालयीन चौकशी करा, प्रसाद लाड यांची मागणी

मुंबई। राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंवरील आरोपांवर एसआयटी चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचे म्होरक्या नवाब मलिक असल्याची टीका करत त्यांचीही न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी भाजप नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नवाब मलिक ड्रग्ज माफियांना पाठीशा घालत असल्याचा आरोप केला आहे. यामुळे जर खरं खोटं करायचे असेल तर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह मलिकांचीही निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करावी अशी मुख्यमंत्र्यांकडे प्रसाद लाड यांनी मागणी केली आहे.

नवाब मलिक यांच्यावर निशाणा

भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात केलेल्या कारवाईवर नवाब मलिकांनी अनेक आरोप केले आहेत. मलिकांवर आणि वानखेडेंवर तक्रारी दाखल झाल्या असून मुंबई पोलीसांचे विशेष पथक या प्रकरणाची चौकशी करत आहेत. वानखेडेंवर २५ कोटी खंडणीचे आणि गैरप्रकारे कारवाई केली असल्याचा आरोप केले आहेत. याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त न्यायाधीशांची ३ जणांची समिती बनवून चौकशी करावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.

खरं की खोटं हे जगासमोर येईल

प्रसाद लाड यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नवाब मलिक या सर्व प्रकरणाची म्होरक्या आहेत. सातत्याने ड्रग्ज माफियांना मागे घालण्याचे काम नवाब मलिक करत आहेत. एसआयटी चौकशी लावायची असेल तर सरकार त्यांचे आहे ते तात्काळ लावू शकतात. परंतु नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, चौकशी लावायची असेल तर सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची ३ जणांची समिती बनवून ती चौकशी करावी मग दूध का दूध आणि पाणी का पाणी, खरं की खोटं हे जगासमोर येईल. समीर वानखेडे यांच्यासारख्या एका कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याला न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. त्यामध्ये नवाब मलिकांची चौकशी झाली पाहिजे कि ते कोणत्या कारणामुळे एनसीबी सारख्या एका मोठ्या यंत्रणेच्या मागे लागले आहेत असे प्रसाद लाड यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फेक न्यूज’ दिल्यास पत्रकाराची मान्यता रद्द

News Desk

मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं!

News Desk

कितीही स्ट्रॅटेजी करा, 2024 मध्ये येणार तर मोदीच, पवार-प्रशांत किशोर भेटीवर फडणवीसांचं वक्तव्य

News Desk